जीवन शिंदे याची जिद्द अभिमानास्पद :- उमेश परिचारक
राष्ट्रीय हॉकी खेळाडूस यूटोपियन शुगर्स ची आर्थिक मदत
कचरेवाडी, ता.मंगळवेढा येथील राष्ट्रीय
पातळीवरील हॉकी खेळाडू जीवन संदिपान शिंदे याची राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्याची
जिद्द ही निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याने यापुढे ही असेच यश मिळवत आपल्या
कचरेवाडी गावाचे नाव जागतिक स्तरा पर्यन्त
पोहचवावे असे गौरवोदगार युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त
केले. जीवन शिंदे या राष्ट्रीय खेळाडूस युटोपियन शुगर्स च्या वतीने रक्कम 10,000/- रुपयांची अर्थ सहाय्य देतेवेळी परिचारक बोलत होते.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, जीवन
शिंदे हा क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे या शाळेत १२ वीत शिकत असून अत्यंत बिकट
परिस्थितीशी सामना करत या खेळाडूने आत्तापर्यंत विविध स्तरावरील हॉकी स्पर्धेत यश
संपादन केले आहे. त्याने मिळविलेले यश कौतुकास्पद असून त्यास प्रोत्साहनपर
अर्थसाहाय्य म्हणून 10000/- रुपये ही रक्कम देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या
व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी शालेय स्पर्धा आवश्यक असून विद्यार्थ्यांचा
शारीरिक व बौद्धिक विकास होणे गरजेचे आहे.कचरेवाडी
सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरा पर्यंत पोहचलेल्या जीवन शिंदे हा एक
आदर्श खेळाडू आहे हॉकी खेळात त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या खेळाडूची कामगिरी अभिमानास्पद असून त्याच्या
खेळास परिस्थितीची अडचण ठरू नये या करिता युटोपियन शुगर्स च्या वतीने प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य करीत असल्याचे मत उमेश
परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक
उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपियन शुगर्स कारखाना हा नेहमीच सामाजिक उपक्रमात
अग्रेसर असतो जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी, आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते जिद्दीच्या
जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडविण्याची ताकत असते.
जीवन शिंदे हा खेळाडू कचरेवाडी येथील रहिवासी असल्याने आम्हाला त्याचा सार्थ
अभिमान आहे. .विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा प्रकाराकडे लक्ष्य देणे गरजेचे
असून ताणतणाव, निरोगी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रसन्न
व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे. आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा पाया शालेय क्रीडा
प्रकारातूनच होत असतो. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंनी अशा स्पर्धेत
सहभागी होऊन यश मिळवावे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी :-
जीवन शिंदे या
खेळाडूस प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय रक्कम देताना युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश
परिचारक, कार्यकारी संचालक,उत्तमराव
पाटील,चीफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, कचरेवाडी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळुंगे,
जीवन शिंदे यांचे पिता संदिपान शिंदे आदि दिसत आहेत.

No comments:
Post a Comment