युटोपियन शुगर्स ऊस गाळपात व साखर
उतार्यात अग्रेसर
चालू गळीत हंगामात ७ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – उत्तमराव पाटील
युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने
चालू गळीत हंगामात विक्रमी गाळप करीत साखर उतार्यात आघाडी घेतली असून,मंगळवेढा,पंढरपूर,तालुक्यामध्ये
आघाडीस दिसून येत आहे.
या
वर्षी युटोपियन शुगर्स चा 5 वा गळीत हंगाम असून 41 व्या दिवस अखेर कारखान्याने 188334
मे.टन उसाचे गाळप करीत 182900 क्विं. साखरेचे उत्पादन करीत सरासरी साखर उतारा 9.78इतका
प्राप्त केला आहे. त्याच प्रमाणे कारखान्याने सह वीज निर्मिती प्रकल्पातून 1 कोटी
50 लाख यूनिट वीज निर्मिती केली असून 96 लाख यूनिट वीज निर्यात केली असल्याची
माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, शून्य
पाणी वापरावर आधारीत अद्यावत तंत्रज्ञान युक्त तसेच गळीत हंगामा अखेर कारखाना 7
लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी युटोपियन प्रशासन प्रयत्नशील आहे.
चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने मशिनरी
तंत्रज्ञामध्ये शक्य ते अल्प असे बदल करून गाळ्प क्षमता 600 मे.टन प्रतिदिन वाढविण्याच्या
प्रयत्न केला आहे. कारखाना दैनंदिन रीत्या
सरासरी 4600ते 4800 मे.टन ऊस गाळप करीत असून पुढील काही दिवसातच अजून ही
गाळप क्षमता वाढवून सरासरी प्रतिदिनं गाळप क्षमता 5000 करण्या बरोबरच दुष्काळी
परिस्थिति मुळे अडचणीत असणार्या ऊस उत्पादक यांचा ऊस प्राधान्याने गाळप
करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
मागील
चार ही हंगामपेक्षा यंदा उच्चांकी गाळप
होत असून असून साखर उतारा ही चांगला आहे.कारखाना पूर्ण क्षमतेने चालू आहे ,कारखान्याचा
यांत्रिक विभाग हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असल्याने कमी खर्चामध्ये व काटकसरिने
कारखान्याची वाटचाल सुरू आहे.सध्या कारखान्याकडे क्षमतेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध आहे.तरी
ही कारखान्याच्या शेती विभागाकडे नोंद असलेला सर्व ऊस गाळप केल्याशिवाय कारखाना
कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही.
कारखान्याने
कायमच मागील चार ही वर्षी एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर दिलेला आहे.कारखाना पूर्ण
क्षमतेने चालत असून ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.मात्र, साखरेचे
बाजार भाव प्रचंड प्रमाणात घसरल्यामुळे कारखानदारी अडचणीत आलेली आहे.हंगामाच्या
सुरूवातीस असणारे साखरेचे दर व सध्याचे साखरेचे दर यामध्ये 200 ते 300 रु.चा फरक
पडलेला आहे.त्यामुळे कारखानदाराकडे ऊस दराचा प्रश्न भेडसावत आहे.सध्याच्या शासनाने
साखर विक्रीची किमान विक्री किंमत 2900 करून साखर कारखानदार यांना दिलासा देण्याचा
प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही सदरची रक्कम ही अल्प असून अनेक कारखानदार
यांनी सदरची साखर विक्री ची किमान किंमत ही 2900 रुपये ऐवजी 3400 करावी
अशी मागणी इंडियन शुगर मिल असोसियशन व महाराष्ट्र राज्य साखर संघ यांनी शासनाकडे केली असून सदरची
मागणी योग्य व रास्त आहे. जर साखर विक्री ची किमान किंमत ही 3400 रुपये
केली तरच कारखानदार यांना ऊस उत्पादक यांची एफआरपी ची रक्कम वेळेत देणे शक्य होणार
आहे. तरीही युटोपियन
शुगर्स हा ऊस उत्पादकांचे हीत
डोळ्यासमोर ठेऊन योग्य तो दर देण्यास प्रयत्नशील राहणार आहे.
अ.नं.
|
कारखान्याचे
नाव
|
ऊस गाळप
|
साखर पोती
|
साखर उतारा
|
|||
आज
|
आज
अखेर
|
आज
|
आज
अखेर
|
आज
|
आज
अखेर
|
1
|
युटोपियन
कचरेवाडी
|
5014
|
188334
|
4900
|
182900
|
10.60
|
9.78
|
2
|
भैरवनाथ-लवंगी
|
4220
|
159240
|
3900
|
142650
|
9.83
|
9.08
|
3
|
F^baTok मंगळवेढा
|
5375
|
154745
|
6000
|
138100
|
10.01
|
9.12
|
4
|
दामाजी
–मंगळवेढा
|
3870
|
103220
|
3850
|
98600
|
10.30
|
9.76
|
5
|
भिमा-टाकळी
सिकंदर
|
2670
|
73210
|
2250
|
60750
|
9.72
|
9.43
|
VERY NICE
ReplyDeleteभावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...
ReplyDeleteपुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा संचालक साहेब
ReplyDelete