मोडनिंब ता.माढा येथे दिनांक २७/०१/२०१९ रोजी
झालेल्या द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन
शुगर्स कचरेवाडी येथील कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून विविध पदकांची
कमाई करत यश संपादन केले. तसेच महाराष्ट्र राज्य
पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तूरा
रोवला.यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे,यांच्या
हस्ते गुणवंत खेळाडूंना आमदार चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक किसन आप्पा जाधव यांच्या सह विविध
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेतील खेळाडूंच्या यशाबद्दल युटोपियन
शुगर्स चे मार्गर्शक तसेच जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व युवानेते प्रणव
मालक परिचारक यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी
कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक
उत्तमराव पाटील,सर्व अधिकारी,खातेप्रमुख,क्रीडा
प्रशिक्षक श्री. अनिल मंडले आदि उपस्थित होते.
स्पर्धेतील
गुणवंत खेळाडू पुढील प्रमाणे:
अनिकेत
फाळके-(४० कि.वजनी गटातून)(प्रथम) तन्मय पाटील -(३० कि.वजनी गटातून) द्वितीय
दादा
दरविषे –-(२५ कि.वजनी गटातून) (प्रथम) अमर पांढरे -(३० कि.वजनी गटातून) तृतीय
कु.पूनम
माने--(३०कि.वजनी गटातून) (प्रथम) तन्मय पाटील-(३२कि.वजनी गटातून) द्वितीय
अभिजीत
गिरमे -(३० कि.वजनी गटातून)द्वितीय श्रेयस पाटील -(३९कि.वजनी गटातून) द्वितीय
माऊली
जाधव-(४४कि.वजनी गटातून) तृतीय वेदान्त
पाटील -(२४ कि.वजनी गटातून) चतुर्थ
सुदर्शन भोसले -(३७कि.वजनी गटातून) द्वितीय समाधान भुसनर -(५८ कि.वजनी गटातून) तृतीय अनिकेत बोंबाळे -(५०कि.वजनी गटातून) तृतीय
फोटो ओळी; द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत
युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील
गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करताना सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व
युवानेते प्रणव मालक परिचारक दिसत आहेत.
No comments:
Post a Comment