
दि.३१/१२/२०१८ रोजी दिल्ली येथे
झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत
युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील कर्मचारी कॉलनीतील कामगारांच्या मुलांनी
भरीव कामगिरी करीत मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. स्पर्धे शिवाय विकास नाही
त्याकरीता स्पर्धेत लढण्याची मानसिकता ठेवून येथील कराटे खेळाडूंनी यश संपादन करीत
युटोपियन शुगर्स चे नाव क्रीडा क्षेत्रात ही देशभर झळकविले असल्याचे मत
कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की,
स्पर्धेत लढणे व यश संपादन करणे याचा अर्थ समोरच्या खेळाडूस हरवणे असा नसून
सदरच्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करणे असा आहे. स्वता: ला सिद्ध करण्यासाठीच विविध
स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. युटोपीयन शुगर्स च्या कामगार वसाहती मधील
कामगाराच्या मुलांनी प्राप्त परिस्थितीशी जुळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली
आहे. ही बाब युटोपियन शुगर्स च्या नावलौकिकस उजाळा देणारी आहे.परिचारक सर्व
खेळाडुंचे व क्रीडा प्रशिक्षक अनिल मंडले यांचे
अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे कार्यकारी
संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपीयन शुगर्स
सुरुवातीपासूनच आपली वेगळी ओळख ठेवून आहे. शून्य पाणी वापर तत्वावरील हा कारखाना
नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतो . या खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा
प्रशिक्षक अनिल मंडले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अशाच प्रकारे आपले
योगदानं या पुढे ही आमच्या कारखान्यास द्यावे युटोपियन शुगर्स नेहमीच आपल्या सोबत
असेल असे मत ही पाटील यांनी व्यक्त केले
या राष्ट्रीय
कराटे स्पर्धेतील यशवंत खेळाडू व
स्पर्धेचा
निकाल पुढील प्रमाणे:
(२५-३०
किलो वजनी गटातून) दादा दरविशे (द्वितीय)
(४८
किलो वजनी गटातून) अनिकेत फाळके (तृतीय)
(५०
किलो वजनी गटातून) हर्षद पासवान (तृतीय)
Nice sir
ReplyDelete