युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम
मध्ये गाळपाचा नवा उच्चांक करेल :- कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील
युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात
४ लाख मे.टन गाळप पूर्ण
प्रतींनिधी:- युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याने २०१८-१९ या ५ व्या चालू गळीत हंगामात दिनांक
11 जानेवारी पर्यंत ८४ व्या दिवसा अखेर कारखान्याने ४,००,७२६ मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण करीत १०.१५ साखर उतारा उतार्या सह ४०८८००
क्विं. साखरेचे उत्पादन केले आहे. तसेच सह-वीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी यूनिट वीज-निंर्मिती करून १.९५
कोटी यूनिट वीज निर्यात केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक
उत्तमराव पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की,
आमच्या युटोपियन शुगर्स या कारखान्याने चालू हळीत हंगामामध्ये मशिंनरीच्या तांत्रिक
कार्यक्षमतेमध्ये अल्पसा बदल केल्याने कारखाना प्रतिदिन ४९०० ते ५००० मे.टन इतके
प्रतिदिन ऊस गाळप करीत आहे. चालू वर्षी ऊसाची उपलब्धता गतवर्षी पेक्षा जास्त आहे
मात्र, दुष्काळी परिस्थितिमुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे
त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत ऊस तोड मिळणे गरजेचे आहे. ऊस उत्पादकांच्या ऊस तोडीस प्रथम प्राधान्य देऊन
प्रोग्रामप्रमाणे ऊसतोड चालू आहे. शून्यपाणी वापर तत्वावरील या कारखान्याने ऊस उत्पादकांचा
विश्वास संपादन केल्याने अनेक ऊस उत्पादक यांच्याशी युटोपियन युटोपियन शुगर्स चे ऋणानुबंध
निर्माण झालेले आहेत. अतिरिक्त ऊसाचा
प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने कारखान्याच्या च्या वतीने इतर कारखान्यास ही ऊस
दिला जात असून ऊस उत्पादकांच्या ऊसाची तोड वेळेत करण्याच्या दृष्टीने कारखाना
प्रशासन प्रयत्नशील आहे.. तथापि ऊस उत्पादक यांनीही संयम राखणे आवश्यक आहे.
पुढील गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता कमी असल्याने
ऊस उत्पादकांना जास्तीचे ऊस उत्पादन मिळावे या करिता आमचे कारखाना वतीने
प्रोत्साहनपर ऊस पीक योजना राबविण्याचे निश्चित केले असून निडवा पिक संवर्धन करिता प्रती मे.टन १०० रुपये अनुदान म्हणून
कारखाना वतीने देण्यात येणार आहे.याचा लाभ ऊस उत्पादक यांनी घ्यावा. ऊस
उत्पादकांची उत्पादकता वाढावी यासाठी कारखाना नेहमीच प्रयत्नशील असून एकरी १०० टन
कसे मिळवायचे या करिता मार्गदर्शनपर मेळावे,खोडवा पीक व्यवस्थापन,जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, उत्पादन खर्चामध्ये
बचतीचे मार्ग यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. कारखान्याचा अत्याधुनिक यांत्रिक विभाग
व उत्पादन विभाग तसेच शेती विभाग यांचे कडील नोंदी नुसार चालू गळीत हंगामामध्ये
असणारी ऊसाची उपलब्धता यामुळे कारखाना गाळपाचा नवा उच्चांक करीत अपेक्षित उद्दिष्ट
निश्चितपणाने सध्या करेल असा आशावाद ही पाटील यांनी व्यक्ता केला.
कारखान्याने ३०/११/२०१८ अखेर कारखान्याकडे गाळप
झालेला संपूर्ण ऊस बिलाची रक्कम प्रति मे.टन २००० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या
खात्यावर वर्ग केलेली आहे. व पुढील कालावधीची रक्कम ही लवकरात लवकर ऊस
उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तथापि ऊस उत्पादक यांनी संयम रखत
शून्यपाणी वापर तत्वावरील कारखान्यास सहकार्य करावे कारखान्याच्या शेती विभागाकडे नोंदीत
असणार्या सर्व ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला
जाणार नसल्याची ग्वाही ही पाटील यांनी दिली.
यावेळी
कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी उत्कृष्ट
योगदांनाबद्दल कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे,
चीफ इंजनियर सुनील महामुनी, चीफ केमिस्ट अनिलकुमार लोभे यांचे
अभिनंदन केले.
R/sir
ReplyDeleteCongratulation
From chougule
Thanks
DeleteGreat
ReplyDelete