Thursday, January 31, 2019

महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स च्या खेळाडुंचे यश


  
 मोडनिंब ता.माढा येथे दिनांक २७/०१/२०१९ रोजी झालेल्या द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून विविध पदकांची कमाई करत यश संपादन केले. तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवून युटोपियन शुगर्स च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तूरा रोवला.यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे,यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंना आमदार चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी  उद्योजक किसन आप्पा जाधव यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
   सदर स्पर्धेतील खेळाडूंच्या यशाबद्दल युटोपियन शुगर्स चे मार्गर्शक तसेच जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व युवानेते प्रणव मालक परिचारक यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,सर्व अधिकारी,खातेप्रमुख,क्रीडा प्रशिक्षक श्री. अनिल मंडले आदि उपस्थित होते. 
स्पर्धेतील गुणवंत खेळाडू पुढील प्रमाणे:
अनिकेत फाळके-(४० कि.वजनी गटातून)(प्रथम)     तन्मय पाटील -(३० कि.वजनी गटातून) द्वितीय
दादा दरविषे –-(२५ कि.वजनी गटातून) (प्रथम)      अमर पांढरे -(३० कि.वजनी गटातून) तृतीय
कु.पूनम माने--(३०कि.वजनी गटातून) (प्रथम)       तन्मय पाटील-(३२कि.वजनी गटातून) द्वितीय
अभिजीत गिरमे -(३० कि.वजनी गटातून)द्वितीय    श्रेयस पाटील -(३९कि.वजनी गटातून) द्वितीय
माऊली जाधव-(४४कि.वजनी गटातून) तृतीय     वेदान्त पाटील -(२४ कि.वजनी गटातून) चतुर्थ    सुदर्शन भोसले -(३७कि.वजनी गटातून) द्वितीय  समाधान भुसनर -(५८ कि.वजनी गटातून) तृतीय  अनिकेत बोंबाळे -(५०कि.वजनी गटातून) तृतीय

फोटो ओळी;  द्वितीय महाराष्ट्र राज्य रिओ कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करताना सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक व युवानेते प्रणव मालक परिचारक दिसत आहेत. 

Friday, January 18, 2019

कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक


    कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेचे कार्य कौतुकास्पद - सौ.सीमाताई परिचारक
प्रशालेचा प्रथम वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न
       पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याने मंगळवेढा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीस सुरुवात झाली असून प्रशालेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे प्रतिपादन पांडुरंग प्रतिष्ठान च्या संचालिका सौ. सीमाताई प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. त्या कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा दिनांक 17/01/2019 रोजीच्या प्रथम वार्षिक  स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. 
    प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सौ.सीमाताई परिचारक यांच्या शुभहस्ते तसेच युटोपीयन शूगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या सुविद्यपत्नी सौ.विजयाताई पाटील,कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर.माधवीताई हवालदार प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे,तनिशा पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
      सदर प्रसंगी बोलताना सौ. परिचारक म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पाठखळ या प्रशालेने शैक्षणिक प्रगति बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आयोजित केलेले स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आदर्श समाज व्यवस्था घडविण्यासाठी उचललेले क्रांतिकारी पाऊल असून कर्मयोगी विद्यानिकेतन चे हे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रशालेने अल्पावधीतच  एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत ही सौ.परिचारक यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या सौ.शैलाताई कर्णिकर म्हणल्या की मागील 25 वर्षाहून ही अधिक काळ मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. विविध संस्था मध्ये मी कार्य केले आहे. मात्र, पांडुरंग परिवारामधे परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या सर्व संस्था या समाजाला वेगळी दिशा देत आहेत आदर्शसंस्था म्हणून या संस्थांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेने अल्पावधीतच आयोजित केलेला हा कार्यक्रम व त्याकरीता आयोजित केलेली व्यवस्था पाहून आयोजकांच्या कामाची कार्यपद्धती आदर्शवत असल्याचे दिसून येते याचा आम्हास अभिमान वाटतो.
            यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कोळी गीत,धनगरी-गीत,लावणी,महाराष्ट्राची लोकधारा,हिन्दी,मराठी,सिनेमा गीते,बाल गीते इत्यादि प्रकारच्या कला सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तर उपस्थित प्रेक्षकांनी ही भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मनमुराद दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शिंदे,अनीता होणराव आदींनी केले. तर आभार प्रशालेच्या प्र.मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे यांनी मानले.
 युटोपियन शुगर्स च्या वतीने महिलांकरिता दर वर्षी प्रमाणे मकर संक्रांती निमित्ताने हळदी-कुंकू व तीळ गूळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थी,पालक,उपस्थितीत सर्व महिला वर्ग आदीं करीता युटोपियन परिवाराच्या वतीने स्नेह भोजनाची सोय करण्यात आली होती. उपस्थित सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन संयोजकाकडून करण्यात आलेल्या चोख नियोजन व्यवस्थेचे कौतुक केले.  

Saturday, January 12, 2019

युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम मध्ये गाळपाचा नवा उच्चांक करेल :- कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील


युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम मध्ये गाळपाचा नवा उच्चांक करेल :- कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील
युटोपियन शुगर्स चे चालू गळीत हंगामात ४ लाख मे.टन गाळप पूर्ण

 प्रतींनिधी:-      युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याने २०१८-१९ या ५ व्या चालू गळीत हंगामात दिनांक 11 जानेवारी पर्यंत ८४ व्या दिवसा अखेर कारखान्याने  ,००,७२६ मे.टन ऊसाचे गाळप पूर्ण करीत १०.१५ साखर उतारा उतार्‍या सह ४०८८०० क्विं. साखरेचे उत्पादन केले आहे. तसेच सह-वीज निर्मिती प्रकल्पातून ३ कोटी यूनिट वीज-निंर्मिती करून १.९५ कोटी यूनिट वीज निर्यात केली असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी दिली.
  पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आमच्या युटोपियन शुगर्स या कारखान्याने चालू हळीत हंगामामध्ये मशिंनरीच्या तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये अल्पसा बदल केल्याने कारखाना प्रतिदिन ४९०० ते ५००० मे.टन इतके प्रतिदिन ऊस गाळप करीत आहे. चालू वर्षी ऊसाची उपलब्धता गतवर्षी पेक्षा जास्त आहे मात्र, दुष्काळी परिस्थितिमुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत ऊस तोड मिळणे गरजेचे आहे.  ऊस उत्पादकांच्या ऊस तोडीस प्रथम प्राधान्य देऊन प्रोग्रामप्रमाणे ऊसतोड चालू आहे. शून्यपाणी वापर तत्वावरील या कारखान्याने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने अनेक ऊस उत्पादक यांच्याशी युटोपियन युटोपियन शुगर्स चे ऋणानुबंध  निर्माण झालेले आहेत. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने कारखान्याच्या च्या वतीने इतर कारखान्यास ही ऊस दिला जात असून ऊस उत्पादकांच्या ऊसाची तोड वेळेत करण्याच्या दृष्टीने कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे.. तथापि ऊस उत्पादक यांनीही संयम राखणे आवश्यक आहे.
 पुढील गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता कमी असल्याने ऊस उत्पादकांना जास्तीचे ऊस उत्पादन मिळावे या करिता आमचे कारखाना वतीने प्रोत्साहनपर ऊस पीक योजना राबविण्याचे निश्चित केले असून निडवा  पिक संवर्धन  करिता प्रती मे.टन १०० रुपये अनुदान म्हणून कारखाना वतीने देण्यात येणार आहे.याचा लाभ ऊस उत्पादक यांनी घ्यावा. ऊस उत्पादकांची उत्पादकता वाढावी यासाठी कारखाना नेहमीच प्रयत्नशील असून एकरी १०० टन कसे मिळवायचे या करिता मार्गदर्शनपर मेळावे,खोडवा पीक व्यवस्थापन,जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, उत्पादन खर्चामध्ये बचतीचे मार्ग यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. कारखान्याचा अत्याधुनिक यांत्रिक विभाग व उत्पादन विभाग तसेच शेती विभाग यांचे कडील नोंदी नुसार चालू गळीत हंगामामध्ये असणारी ऊसाची उपलब्धता यामुळे कारखाना गाळपाचा नवा उच्चांक करीत अपेक्षित उद्दिष्ट निश्चितपणाने सध्या करेल असा आशावाद ही पाटील यांनी व्यक्ता केला.
 कारखान्याने ३०/११/२०१८ अखेर कारखान्याकडे गाळप झालेला संपूर्ण ऊस बिलाची रक्कम प्रति मे.टन २००० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. व पुढील कालावधीची रक्कम ही लवकरात लवकर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तथापि ऊस उत्पादक यांनी संयम रखत शून्यपाणी वापर तत्वावरील कारखान्यास सहकार्य करावे कारखान्याच्या शेती विभागाकडे नोंदीत असणार्‍या सर्व ऊसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नसल्याची ग्वाही ही पाटील यांनी दिली.
यावेळी कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी उत्कृष्ट योगदांनाबद्दल कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, चीफ इंजनियर सुनील महामुनी, चीफ केमिस्ट अनिलकुमार लोभे यांचे अभिनंदन केले.

Wednesday, January 9, 2019

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स च्या खेळाडुंचे अभूतपूर्व यश कौतुकास्पद :- उमेश परिचारक




     दि.३१/१२/२०१८ रोजी  दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धेत  युटोपियन शुगर्स कचरेवाडी येथील कर्मचारी कॉलनीतील कामगारांच्या मुलांनी भरीव कामगिरी करीत मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे. स्पर्धे शिवाय विकास नाही त्याकरीता स्पर्धेत लढण्याची मानसिकता ठेवून येथील कराटे खेळाडूंनी यश संपादन करीत युटोपियन शुगर्स चे नाव क्रीडा क्षेत्रात ही देशभर झळकविले असल्याचे मत कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले. 
      यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, स्पर्धेत लढणे व यश संपादन करणे याचा अर्थ समोरच्या खेळाडूस हरवणे असा नसून सदरच्या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करणे असा आहे. स्वता: ला सिद्ध करण्यासाठीच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. युटोपीयन शुगर्स च्या कामगार वसाहती मधील कामगाराच्या मुलांनी प्राप्त परिस्थितीशी जुळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. ही बाब युटोपियन शुगर्स च्या नावलौकिकस उजाळा देणारी आहे.परिचारक सर्व खेळाडुंचे व क्रीडा प्रशिक्षक अनिल मंडले यांचे  अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपीयन शुगर्स सुरुवातीपासूनच आपली वेगळी ओळख ठेवून आहे. शून्य पाणी वापर तत्वावरील हा कारखाना नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतो . या खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा प्रशिक्षक अनिल मंडले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अशाच प्रकारे आपले योगदानं या पुढे ही आमच्या कारखान्यास द्यावे युटोपियन शुगर्स नेहमीच आपल्या सोबत असेल असे मत ही पाटील यांनी व्यक्त केले
या राष्ट्रीय कराटे स्पर्धेतील यशवंत खेळाडू व
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
(२५-३० किलो वजनी गटातून) दादा दरविशे (द्वितीय)  
(४८ किलो वजनी गटातून) अनिकेत फाळके (तृतीय)
(५० किलो वजनी गटातून) हर्षद पासवान (तृतीय)


Tuesday, January 8, 2019

राष्ट्रीय हॉकी खेळाडू जीवन शिंदे याची जिद्द अभिमानास्पद :- उमेश परिचारक


जीवन शिंदे याची जिद्द अभिमानास्पद :- उमेश परिचारक
राष्ट्रीय हॉकी खेळाडूस यूटोपियन शुगर्स ची आर्थिक मदत
   कचरेवाडी, ता.मंगळवेढा येथील राष्ट्रीय पातळीवरील हॉकी खेळाडू जीवन संदिपान शिंदे याची राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचण्याची जिद्द ही निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याने यापुढे ही असेच यश मिळवत आपल्या कचरेवाडी गावाचे  नाव जागतिक स्तरा पर्यन्त पोहचवावे असे गौरवोदगार युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले. जीवन शिंदे या राष्ट्रीय खेळाडूस युटोपियन शुगर्स च्या वतीने रक्कम 10,000/- रुपयांची अर्थ सहाय्य देतेवेळी परिचारक बोलत होते. 
     यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, जीवन शिंदे हा क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे या शाळेत १२ वीत शिकत असून अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करत या खेळाडूने आत्तापर्यंत विविध स्तरावरील हॉकी स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्याने मिळविलेले यश कौतुकास्पद असून त्यास प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य म्हणून 10000/- रुपये ही रक्कम देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी शालेय स्पर्धा आवश्यक असून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होणे गरजेचे आहे.कचरेवाडी सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरा पर्यंत पोहचलेल्या जीवन शिंदे हा एक आदर्श खेळाडू आहे हॉकी खेळात त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.  या खेळाडूची कामगिरी अभिमानास्पद असून त्याच्या खेळास परिस्थितीची अडचण ठरू नये या करिता युटोपियन शुगर्स च्या वतीने प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य करीत असल्याचे मत उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.
      यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपियन शुगर्स कारखाना हा नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतो जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी, आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडविण्याची ताकत असते. जीवन शिंदे हा खेळाडू कचरेवाडी येथील रहिवासी असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. .विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा प्रकाराकडे लक्ष्य देणे गरजेचे असून ताणतणाव, निरोगी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रसन्न व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे. आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा पाया शालेय क्रीडा प्रकारातूनच होत असतो. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंनी अशा स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवावे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी :-
जीवन शिंदे या खेळाडूस प्रोत्साहनात्मक अर्थसाहाय रक्कम देताना युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक,उत्तमराव पाटील,चीफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, कचरेवाडी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळुंगे, जीवन शिंदे यांचे पिता संदिपान शिंदे आदि दिसत आहेत.