Saturday, November 4, 2023

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

 

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

मंगळवेढा :- युटोपियन शुगर्स लि. हा कारखाना  गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गळीत झालेल्या ऊसास प्रती मे.टन १११ रु. प्रमाणे सुधारीत दर  देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली.

या वेळी बोलताना परिचारक म्हणाले की,  मोळी पूजन दिवशी (दिनांक ०१/११/२०२३) दिवाळी साठी म्हणून ५१ रु. ज्यादा दर देणार असल्याची घोषणा कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलेली होती.

त्यास अनुसरून कारखाना प्रशासना कडून सदरची रु.५१ प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर आज दिनाक ०४/११/२०२३ रोजी वर्गही करण्यात आलेली आहे.

मात्र. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक, ठेकेदार व प्रमुख पदाधिकारी यांनी कारखाना प्रशासनाकडे अधिकच्या दराची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार, व कारखान्याचे  मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत मालक परिचारक   पांडुरंग परिवारातील जेष्ठ नेते मा. दिनकर भाऊ मोरे, यांच्या सुचने  नुसार त्यांच्या मागणीचा व दुष्काळी परिस्थितीचा सकारात्मक विचार करून दिवाळी साठी नव्याने ६० रु प्रती मे.टन दर देणार असल्याची घोषणा चेअरमन उमेश परिचारक यांनी केली आहे. .

रक्कम रु. १११ चा नवीन दर जाहीर केल्या मुळे गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गाळप झालेल्या ८६०३२ या ऊसाच्या जातीस एकूण दर हा रु. २५११ इतका होत आहे. तर इतर ऊसाच्या जातीस २४११ रु होत आहे. नव्याने घोषित करीत असलेली सदरची रु.६० प्रती मे.टन प्रमाणे होणारी रक्कम ही दिवाळी पूर्वी ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रती वर्षी प्रमाणे  दीपावली साठी ऊस उत्पादक यांच्या करीता सवलतीच्या दरातील साखर वाटप हे युटोपियन शुगर्स च्या संबंधीत गट विभागातून दिनांक ०६/११/२०२३ पासून करण्यात येणार आहे.तसेच गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता यापूर्वीच घोषित केल्या प्रमाणे पहिली उचल ही रु. २५११ प्रमाणे देणार असल्याचे ही परिचारक यांनी यावेळी सांगितले.

या वेळी पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपआप्पा घाडगे, सभापती हरिष दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे,संचालक नागनाथ मोहिते,बंडू पवार,आगतराव रणदिवे,बाबा पाटील,रतीलाल गावडे,सोमनाथ आकरे, सुनील काका भोसले, दगडू हाके,यशवंत कार्ंडे, कल्याण नलावडे,प्रकाश येडगे, नागराज पाटील यांचे सह पंढरपूर मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, ऊस उत्पादक शेतकरी आदि उपस्थित होते .

No comments:

Post a Comment