Wednesday, November 22, 2023

मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते जालिहाळ येथे उद्या नुतन सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा नागरी सत्कार

 मंगळवेढा तालुक्यातील मौजे जालिहाळ-सिध्दनकेरी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचउपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा नागरी सत्कार सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २४/११/२०२३ रोजी सांयकाळी ठिक ५ वाजता आयोजित केला आहे.

सदरच्या कार्यक्रमास दामाजी सह.सा. कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिल्हा संचालक औदुंबर वाडदेकर,गौरीशंकर बुरकुल,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी सदस्य युन्नुस शेख, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी तालुक्यातील नुतन सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी या नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जालिहाळ-सिध्दनकेरीचे मा.सरपंच सचिन चौगुले यांनी केले आहे.


टीप :-कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.





Saturday, November 4, 2023

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

 

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

मंगळवेढा :- युटोपियन शुगर्स लि. हा कारखाना  गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गळीत झालेल्या ऊसास प्रती मे.टन १११ रु. प्रमाणे सुधारीत दर  देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली.

या वेळी बोलताना परिचारक म्हणाले की,  मोळी पूजन दिवशी (दिनांक ०१/११/२०२३) दिवाळी साठी म्हणून ५१ रु. ज्यादा दर देणार असल्याची घोषणा कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलेली होती.

त्यास अनुसरून कारखाना प्रशासना कडून सदरची रु.५१ प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर आज दिनाक ०४/११/२०२३ रोजी वर्गही करण्यात आलेली आहे.

मात्र. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक, ठेकेदार व प्रमुख पदाधिकारी यांनी कारखाना प्रशासनाकडे अधिकच्या दराची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार, व कारखान्याचे  मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत मालक परिचारक   पांडुरंग परिवारातील जेष्ठ नेते मा. दिनकर भाऊ मोरे, यांच्या सुचने  नुसार त्यांच्या मागणीचा व दुष्काळी परिस्थितीचा सकारात्मक विचार करून दिवाळी साठी नव्याने ६० रु प्रती मे.टन दर देणार असल्याची घोषणा चेअरमन उमेश परिचारक यांनी केली आहे. .

रक्कम रु. १११ चा नवीन दर जाहीर केल्या मुळे गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गाळप झालेल्या ८६०३२ या ऊसाच्या जातीस एकूण दर हा रु. २५११ इतका होत आहे. तर इतर ऊसाच्या जातीस २४११ रु होत आहे. नव्याने घोषित करीत असलेली सदरची रु.६० प्रती मे.टन प्रमाणे होणारी रक्कम ही दिवाळी पूर्वी ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रती वर्षी प्रमाणे  दीपावली साठी ऊस उत्पादक यांच्या करीता सवलतीच्या दरातील साखर वाटप हे युटोपियन शुगर्स च्या संबंधीत गट विभागातून दिनांक ०६/११/२०२३ पासून करण्यात येणार आहे.तसेच गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता यापूर्वीच घोषित केल्या प्रमाणे पहिली उचल ही रु. २५११ प्रमाणे देणार असल्याचे ही परिचारक यांनी यावेळी सांगितले.

या वेळी पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपआप्पा घाडगे, सभापती हरिष दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे,संचालक नागनाथ मोहिते,बंडू पवार,आगतराव रणदिवे,बाबा पाटील,रतीलाल गावडे,सोमनाथ आकरे, सुनील काका भोसले, दगडू हाके,यशवंत कार्ंडे, कल्याण नलावडे,प्रकाश येडगे, नागराज पाटील यांचे सह पंढरपूर मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, ऊस उत्पादक शेतकरी आदि उपस्थित होते .

Wednesday, November 1, 2023

युटोपियन शुगर्स चा अनोखा उपक्रम :- ऊस तोड कामगारांच्या हस्ते गव्हानीत मोळी टाकून केला गळीत हंगामाचा शुभारंभ . मागील गळीत हंगामासाठी ५१ रु, चालू गळीत हंगामासाठी २५११ रु पहिली उचल , तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३% बोनस देणार : उमेश परिचारक


 

युटोपियन शुगर्स चा अनोखा उपक्रम :- ऊस तोड कामगारांच्या हस्ते गव्हानीत मोळी टाकून केला गळीत हंगामाचा शुभारंभ

मागील गळीत हंगामासाठी ५१ रु, चालू गळीत हंगामासाठी २५११ रु पहिली उचल , तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३% बोनस देणार : उमेश परिचारक

मंगळवेढा प्रतिंनिधी: दि.०१

      स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेला वारसा अखंड चालवीत समाजातील उपेक्षित घटकास समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या आमचा नेहमीच प्रयत्न आज पर्यंत राहिला आहे. याच दृष्टीकोणातून आज आपण ऊस तोड कामगार यांच्या  शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२३-२०२४ चा शुभारंभ करीत असल्याची माहिती युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, ऊस तोड कामगारांच्या  पिढ्यान पिढ्या या ऊस तोड करण्यात गेल्या पण हा वर्ग नेहमीच समाजाच्या प्रवाहापासून दूर राहिला आहे. त्यास समाजामध्ये  प्रतिष्ठा देण्याची भूमिका युटोपियन शुगर्स नेहमीच घेत आहे त्यास अनुसरून आज बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून चालू गळीत हंगामाचा शुभारंभ करीत आहोत. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. ऊसाची उपलबद्धता कमी आहे. सर्वात जास्त साखर कारखाने हे आपल्याच सोलापूर जिल्ह्यात आहेत. ऊसाची वाढ पुरेश्या प्रमाणात झाली नसल्याने वजनही कमी होणार आहे त्याचा परिणाम म्हणून रिकव्हरी कमी लागेल असा अंदाज आहे. असे असतांनाही मागील १० वर्षापासून युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण केले असल्यामुळे चालू गळीत हंगामासाठी जवळपास ७ हजार हेक्टर च्या नोंदी युटोपियन शुगर्स च्या शेती विभागाकडे आहेत. अद्यावत यंत्र सामग्री वापरण्यासाठी आपला कारखाना नेहमीच अग्रेसर असतो त्यामुळे वाहन काटयांच्या तपासणी/फेर पडताळणी वेळी शासनाच्या नवीन नियमा नुसार प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (SOP )चा वापरही आपल्या कारखान्या कडून करण्यात येत आहे. कारखाना प्रशासनाने मागील वर्षी पासून गाळप क्षमते मध्ये वाढ केल्याने प्रती दिन ५२०० मे.टन गाळप करण्यात येणार आहे .

सवर्त्र सध्या ऊस दराची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत युटोपियन शुगर्स कदापि मागे असणार नाही असे सांगून परिचारक यांनी मागील गळीत हंगामामधील गाळप ऊसास प्रती मे.टन ५१ रू वाढीव दर देण्यात येणार आहे. या वाढीव दरामुळे मागील वर्षीच्या ८६०३२ या जातीच्या ऊसास रु. १०० अनुदाना सह एकूण  २४५१ रू प्रती मे.टन इतका मोबदला दिला आहे. तर इतर जातीच्या ऊसास २३५१ रू. इतका दर होत आहे. तसेच चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता ही २५११ रू पहिली उचल  देणार आहे. कामगार वर्गाची ही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना ही ८.३३ % दिवाळी बोनस ही देणार आहोत.

 प्रारंभी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते विधिवत मोळी पूजन करण्यात आले.

 सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख , अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक तसेच कल्याण नलवडे,आप्पासाहेब घाडगे यांचे समवेत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

फोटो ओळी :- युटोपियन शुगर्स ने अनोखा उपक्रम राबवित महिला ऊस तोड कामगार  यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२३-२०२४ चा शुभारंभ करण्यात आला सदर प्रसंगी ऊस तोड मजूर,कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी रोह परिचारक, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख,तोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी वर्ग दिसत आहे.