Friday, June 2, 2023

युटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट –रोहन परिचारक



युटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट –रोहन परिचारक

दशक पूर्ती मिल रोलर पूजन उत्साहात संपन्न.

 मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.हा कारखाना गळीत हंगाम २०२३-२०२४ ची संपूर्ण तयारी करीत आहे. या पूर्वतयारीचाच एक भाग म्हणुन आज शुक्रवार दि.०२/०६/२०२३ रोजी मिल रोलर चे पूजन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  

यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्स चा गळीत हंगाम २०२३-२०२४  हा दहावा गळीत हंगाम आहे.  चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे चांगल्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. तथापी,येणारा गळीत हंगाम हा उपलब्ध पर्जन्यमान या वर अवलंबून आहे . या वर्षी पर्जन्यमान चांगले असेल अशी आपण अपेक्षा करुयात त्यामुळे येत्या हंगामात युटोपियन शुगर्स चा हा दशक पूर्ती गळीत हंगाम हा विक्रमी करण्याचा आमचा माणस आहे. त्या नुसार कारखान्याचा शेती विभाग काम करत असून  तोडणी वाहतुकीचे  करार पूर्ण करण्यात आलेले आहेत.शेती विभागाच्या प्रतींनिधी यांनी ऊस उत्पादक यांचे कडे पोहचणे महत्वाचे आहे त्यानुसार शेती विभाग कार्यरत आहे. त्याच प्रमाणे अभियांत्रिकी विभाग व उत्पादन विभाग ही आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करेल तसेच मागील ९ वर्ष ऊस उत्पादकांच्या विश्वासावरच व कामगार वर्गाच्या श्रमावर युटोपियन शुगर्स लि.हा १० व्या वर्षात पदार्पण करीत असून येणार्‍या हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद ही परिचारक यांनी व्यक्त केला

या वेळी सेवानिवृत कर्मचारी बाळासाहेब विटठ्ल कुलकर्णी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभ हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी  कारखान्याचे सर्व खाते प्रमुख,अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी व्यक्त केले.  

     फोटो ओळी : युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या दहाव्या  व गळीत हंगाम २०२३-२०२४ च्या पूर्व तयारीचा भाग म्हणून आयोजित मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांचे समवेत सर्व खाते प्रमुख, अधिकारी,व कर्मचारी वर्ग दिसत आहे.

छायाचित्र :- सागर राजमाने

 

 

 

No comments:

Post a Comment