Wednesday, January 18, 2023

अचानक केलेल्या वजन काटा तपासणीत युटोपियन शुगर्स चा वजन काटा तंतोतत, कारखान्याची विश्वासाहार्यता अभेद्य, वैधमापन शास्त्र विभागाच्या पथकाने वजन काटा बिनचूक असल्याचा दिला अहवाल.


 

अचानक केलेल्या वजन काटा तपासणीत युटोपियन शुगर्स चा वजन काटा तंतोतत, कारखान्याची विश्वासाहार्यता अभेद्य, वैधमापन शास्त्र विभागाच्या पथकाने वजन काटा बिनचूक असल्याचा दिला अहवाल.

मंगळवेढा प्रतींनिधी :-

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याने सुरुवाती पासूनच ऊस उत्पादक यांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्यामुळेच कारखान्याचा चालू गळीत हंगामात ही ऊस उत्पादक यांचे कडून मिळत असलेल्या प्रतिसादा मुळे कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहे. सोलापूर जिल्हयाचे जिल्हा अधिकारी यांचे सूचने नुसार वैधमापन शास्त्र विभाग निरीक्षकांच्या नेतृत्वा खालील भरारी पथकाने बुधवार दिनांक १८/०१/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता अचानक पणे वजन काटा तपासणी केली. तपासणी नंतर  यूटोपियन शुगर्स चा वजन काटा हा तंतोतत बरोबर असल्याचा अहवाल वैधमापन  शास्त्र विभाग निरीक्षक यांनी दिला आहे.

      चेअरमन उमेश परिचारक यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सध्या पूर्ण क्षमतेने चालविला जात असून ऊस उत्पादक यांचा विश्वास हीच आमची प्रेरणा असल्याचे मत यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांनी व्यक्त केले.

या वेळी वैधमापन शास्त्र विभागाच्या भरारी पथकातील अधिकारी यांनी ऊसाने भरलेली वाहने वजन काटा करून गव्हाणी कडे गेली असता सदरची वाहने परत बोलवून त्या वाहनांची फेर तपासणी केली. तसेच कारखान्या कडे प्रमाणित केलेल्या  २० किलो वजना नुसार स्वतंत्र तपासणी केली या मध्ये कोणताही फरक  आढळून आला नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगून तसा अहवाल कारखान्यास दिला आहे.

सदरची तपासणी मा. सहय्य्क नियंत्रक, वैधमापन शास्त्र, सोलापूर जिल्हा व श्री पी.एच. मगर, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, सोलापूर ४ – विभाग, तसेच मा. अ.ध. गेटमे, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, सोलापूर जिल्हा, मा. अ. नि. बचुटे लेखा परीक्षक श्रेणी १ साखर सोलापूर यांनी केली .

यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक ,चीफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर,मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे ,संगणक विभाग प्रमुख अभिजीत यादव, केनयार्ड सुपरवायझर श्रीकांत गणपाटील¸ ऊस उत्पादक, वाहतूकदार , चालक आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment