Wednesday, November 22, 2023

मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते जालिहाळ येथे उद्या नुतन सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा नागरी सत्कार

 मंगळवेढा तालुक्यातील मौजे जालिहाळ-सिध्दनकेरी ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचउपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा नागरी सत्कार सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २४/११/२०२३ रोजी सांयकाळी ठिक ५ वाजता आयोजित केला आहे.

सदरच्या कार्यक्रमास दामाजी सह.सा. कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजी खरात, जिल्हा संचालक औदुंबर वाडदेकर,गौरीशंकर बुरकुल,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी सदस्य युन्नुस शेख, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी तालुक्यातील नुतन सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य यांनी या नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जालिहाळ-सिध्दनकेरीचे मा.सरपंच सचिन चौगुले यांनी केले आहे.


टीप :-कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.





Saturday, November 4, 2023

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

 

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळी साठी रु. १११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

मंगळवेढा :- युटोपियन शुगर्स लि. हा कारखाना  गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गळीत झालेल्या ऊसास प्रती मे.टन १११ रु. प्रमाणे सुधारीत दर  देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी केली.

या वेळी बोलताना परिचारक म्हणाले की,  मोळी पूजन दिवशी (दिनांक ०१/११/२०२३) दिवाळी साठी म्हणून ५१ रु. ज्यादा दर देणार असल्याची घोषणा कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलेली होती.

त्यास अनुसरून कारखाना प्रशासना कडून सदरची रु.५१ प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर आज दिनाक ०४/११/२०२३ रोजी वर्गही करण्यात आलेली आहे.

मात्र. ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक, ठेकेदार व प्रमुख पदाधिकारी यांनी कारखाना प्रशासनाकडे अधिकच्या दराची मागणी केली होती. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चे नुसार, व कारखान्याचे  मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत मालक परिचारक   पांडुरंग परिवारातील जेष्ठ नेते मा. दिनकर भाऊ मोरे, यांच्या सुचने  नुसार त्यांच्या मागणीचा व दुष्काळी परिस्थितीचा सकारात्मक विचार करून दिवाळी साठी नव्याने ६० रु प्रती मे.टन दर देणार असल्याची घोषणा चेअरमन उमेश परिचारक यांनी केली आहे. .

रक्कम रु. १११ चा नवीन दर जाहीर केल्या मुळे गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गाळप झालेल्या ८६०३२ या ऊसाच्या जातीस एकूण दर हा रु. २५११ इतका होत आहे. तर इतर ऊसाच्या जातीस २४११ रु होत आहे. नव्याने घोषित करीत असलेली सदरची रु.६० प्रती मे.टन प्रमाणे होणारी रक्कम ही दिवाळी पूर्वी ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रती वर्षी प्रमाणे  दीपावली साठी ऊस उत्पादक यांच्या करीता सवलतीच्या दरातील साखर वाटप हे युटोपियन शुगर्स च्या संबंधीत गट विभागातून दिनांक ०६/११/२०२३ पासून करण्यात येणार आहे.तसेच गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता यापूर्वीच घोषित केल्या प्रमाणे पहिली उचल ही रु. २५११ प्रमाणे देणार असल्याचे ही परिचारक यांनी यावेळी सांगितले.

या वेळी पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपआप्पा घाडगे, सभापती हरिष दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे,संचालक नागनाथ मोहिते,बंडू पवार,आगतराव रणदिवे,बाबा पाटील,रतीलाल गावडे,सोमनाथ आकरे, सुनील काका भोसले, दगडू हाके,यशवंत कार्ंडे, कल्याण नलावडे,प्रकाश येडगे, नागराज पाटील यांचे सह पंढरपूर मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, ऊस उत्पादक शेतकरी आदि उपस्थित होते .

Wednesday, November 1, 2023

युटोपियन शुगर्स चा अनोखा उपक्रम :- ऊस तोड कामगारांच्या हस्ते गव्हानीत मोळी टाकून केला गळीत हंगामाचा शुभारंभ . मागील गळीत हंगामासाठी ५१ रु, चालू गळीत हंगामासाठी २५११ रु पहिली उचल , तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३% बोनस देणार : उमेश परिचारक


 

युटोपियन शुगर्स चा अनोखा उपक्रम :- ऊस तोड कामगारांच्या हस्ते गव्हानीत मोळी टाकून केला गळीत हंगामाचा शुभारंभ

मागील गळीत हंगामासाठी ५१ रु, चालू गळीत हंगामासाठी २५११ रु पहिली उचल , तर कर्मचारी वर्गास दिवाळी साठी ८.३३% बोनस देणार : उमेश परिचारक

मंगळवेढा प्रतिंनिधी: दि.०१

      स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेला वारसा अखंड चालवीत समाजातील उपेक्षित घटकास समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या आमचा नेहमीच प्रयत्न आज पर्यंत राहिला आहे. याच दृष्टीकोणातून आज आपण ऊस तोड कामगार यांच्या  शुभ हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२३-२०२४ चा शुभारंभ करीत असल्याची माहिती युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, ऊस तोड कामगारांच्या  पिढ्यान पिढ्या या ऊस तोड करण्यात गेल्या पण हा वर्ग नेहमीच समाजाच्या प्रवाहापासून दूर राहिला आहे. त्यास समाजामध्ये  प्रतिष्ठा देण्याची भूमिका युटोपियन शुगर्स नेहमीच घेत आहे त्यास अनुसरून आज बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून चालू गळीत हंगामाचा शुभारंभ करीत आहोत. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. ऊसाची उपलबद्धता कमी आहे. सर्वात जास्त साखर कारखाने हे आपल्याच सोलापूर जिल्ह्यात आहेत. ऊसाची वाढ पुरेश्या प्रमाणात झाली नसल्याने वजनही कमी होणार आहे त्याचा परिणाम म्हणून रिकव्हरी कमी लागेल असा अंदाज आहे. असे असतांनाही मागील १० वर्षापासून युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादक यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण केले असल्यामुळे चालू गळीत हंगामासाठी जवळपास ७ हजार हेक्टर च्या नोंदी युटोपियन शुगर्स च्या शेती विभागाकडे आहेत. अद्यावत यंत्र सामग्री वापरण्यासाठी आपला कारखाना नेहमीच अग्रेसर असतो त्यामुळे वाहन काटयांच्या तपासणी/फेर पडताळणी वेळी शासनाच्या नवीन नियमा नुसार प्रमाणित संचालन कार्यप्रणाली (SOP )चा वापरही आपल्या कारखान्या कडून करण्यात येत आहे. कारखाना प्रशासनाने मागील वर्षी पासून गाळप क्षमते मध्ये वाढ केल्याने प्रती दिन ५२०० मे.टन गाळप करण्यात येणार आहे .

सवर्त्र सध्या ऊस दराची स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत युटोपियन शुगर्स कदापि मागे असणार नाही असे सांगून परिचारक यांनी मागील गळीत हंगामामधील गाळप ऊसास प्रती मे.टन ५१ रू वाढीव दर देण्यात येणार आहे. या वाढीव दरामुळे मागील वर्षीच्या ८६०३२ या जातीच्या ऊसास रु. १०० अनुदाना सह एकूण  २४५१ रू प्रती मे.टन इतका मोबदला दिला आहे. तर इतर जातीच्या ऊसास २३५१ रू. इतका दर होत आहे. तसेच चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता ही २५११ रू पहिली उचल  देणार आहे. कामगार वर्गाची ही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने त्यांना ही ८.३३ % दिवाळी बोनस ही देणार आहोत.

 प्रारंभी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते विधिवत मोळी पूजन करण्यात आले.

 सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख , अधिकारी, कर्मचारी वर्ग, ऊस उत्पादक तसेच कल्याण नलवडे,आप्पासाहेब घाडगे यांचे समवेत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

फोटो ओळी :- युटोपियन शुगर्स ने अनोखा उपक्रम राबवित महिला ऊस तोड कामगार  यांच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगाम २०२३-२०२४ चा शुभारंभ करण्यात आला सदर प्रसंगी ऊस तोड मजूर,कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी रोह परिचारक, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख,तोडणी वाहतूक ठेकेदार व कर्मचारी वर्ग दिसत आहे.

Tuesday, October 17, 2023

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न-चालू गळीत हंगामा मध्येही युटोपियन अपेक्षित ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करेल –उमेश परिचारक

 



मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२३-२०२४ या दहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.१७ /१०/२०२३  रोजी आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते बॉयलरपूजन व अग्निप्रदीपन करण्यात आले. अत्यंत साधेपणाने व संपूर्णत: कौटुंबीक व उत्साही वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

     प्रारंभी कारखान्याचे संगणक विभाग प्रमुख अभिजीत यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री  यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

     यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, गळीत हंगाम २०२३-२०२४ हा आपल्या कारखान्याचा दशकपूर्ती गळीत हंगाम आहे. मागील ९ वर्षात केवळ ऊस उत्पादक व कर्मचारी बांधव यांच्या विश्वासावर आपल्या कारखान्याने नावलौकिक मिळवलेला  आहे. ही विश्वासाहर्ता कायम ठेवण्यासाठी युटोपियन हा कायम बांधील राहील असा विश्वास ही परिचारक यांनी व्यक्त केला.

 

सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही कारखाना चालू गळीग हंगाम २०२३-२०२४ व पुढील ही गळीत हंगाम२०२४-२०२५ हा सुद्धा केवळ ऊस उत्पादक यांच्या विश्वासावर, व ऊस उत्पादक यांना  वेळेत व चांगला दर देत असल्यामुळे यशस्वी पार पडेल असा आशावाद व्यक्त करीत पुढील काळात ही खाजगी कारखान्याच्या तुलनेत ऊस दराबाबतीत युटोपियन कदापी मागे राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने १ कोटी ४४ लाख लिटर चे इथेनोल उत्पादन केले आहे साधारण पणे तितकेच उत्पादन याही वर्षी अपेक्षित आहे गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता आपली सर्व यंत्रणा सज्ज  आहे. सर्व कामगार वर्गांनी आपले कौशल्य पणाला लावून कार्यरत राहावे व गळीत हंगाम यशस्वी करावा  व शक्य तितके काटकसरीचे धोरण अवलंबावे त्यातच आपणा सर्वांचे हित असल्याचे ही त्यांनी सांगितले

 

सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे सह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख , अधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

यावेळी स्वागत , प्रास्ताविक व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले

फोटो ओळी:- युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ करीता  आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,व रोहन परिचारक यांच्या समवेत विभाग प्रमुख अभिजीत यादव यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

Friday, June 9, 2023

दि. १०जून २०२३रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन - उमेश परिचारक

 
 *दि. १०जून २०२३रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन* 
महाराष्ट्राची दक्षिण काशी समजली जाणाऱ्या पंढरपूर येथे प्रति वर्षी आषाढी वारी निमित्ताने लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. मागील वर्षापासून पंढरपूर सायकलर्स क्लब  पंढरपूरचे अध्यक्ष मा. श्री. उमेशजी परिचारक(मालक) यांच्या संकल्पनेतून पायी-वारी या धर्तीवर सायकल वारी हा उपक्रम राबवीत आहोत. सदर उपक्रमाचा उद्देश हा तरुण पिढीस सायकल चालवणेस प्रवृत्त करणे हा आहे. मागील काही वर्षापासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर सायकलर्स क्लब व असंख्य वेगवेगळ्या गावांचे सायकल क्लब यांचे मदतीने सर्वांनी एकाच वेळेस पंढरपूर मध्ये दाखल होऊन एकत्र पंढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा व मोकळ्या पटांगणामध्ये ''विठ्ठल नामघोष'' करीत सायकल रिंगण प्रथा करण्याचे उद्देशाने मागील वर्षी म्हणजेच २०२२मध्ये महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन आयोजित केलेले होते. याकरिता महाराष्ट्राभरातून ३६ठिकाणचे सायकल प्रेमींनी पंढरपूरमध्ये एकत्रित १३०० लोकांचा मुक्काम व स्थानिक २०० असे सुमारे १५०० सायकल प्रेमींनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. या कामी पंढरपूर सायकलर्स क्लबचे विशेष सहकारी लाभले होते.
यावर्षी २०२३ मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब व अन्य यांचे सुचनेनुसार दरवर्षी एका सायकल  क्लबला यजमान पद व संमेलन कार्य करणीचे अध्यक्ष क्लब म्हणून निवड केलेले आहे. 
बारामती सायकल  क्लब यांनी २०२३चे महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन यांची जबाबदारी स्विकारलेली असुन त्यांनी अखिल महाराष्ट्रातील सायकल क्लब यांना सदर सायकलवारी व संमेलनास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले वरून महाराष्ट्रभरातून अद्याप पर्यंत ३९ सायकल क्लब यांनी प्रतिसाद दिलेला असून ते सर्व सायकल प्रेमीनसाठी दि.१० जून २०२३ रोजी सह्याद्री सायं.७.०० वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी येत असून त्यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे  भक्ती निवास (नवीन) व वेदांत भवन या ठिकाणी निवास व जेवणाची सोय केलेली आहे. तसेच भक्तीरस भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला असून त्या कामी पुणे येथून विशेष गायक व साधन सामग्री मागविण्यात आलेले आहे.
दि.११ जुन २०२३रोजी पहाटे ६.३० ते ७.३० पंढरपूर नगर सायकल प्रदूषणा तसेच ७.३० ते ८.३० रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे "विठ्ठल नाम गजर" केला जाणार असून व नंतर सकाळी ९.३० ते १२.०० या दरम्यान अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन २०२३ हे पदमनाथ मंगल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेले आहे.
या सायकलवारी नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व संमेलन यांचे यावर्षीचे उद्दिष्ट पर्यावरण संतुलन वृक्षारोपण शारीरिक समृद्धी तसेच प्रत्येक शहरास  सायकलिंग चे शहर म्हणून ओळख व्हावे या उद्देशाने तमाम महाराष्ट्रभरातून अंदाजे २००० सायकल प्रेमी पंढरपूर नगरीमध्ये येत आहेत. तसेच या सर्व सायकल प्रेमींना अल्पोपहार व भोजन व्यवस्था हे बारामती सायकल क्लबचे यांच्या मार्फत केलेले आहे.
या व्यवस्थेत आम्ही *मा. श्री उमेश परिचारक (मालक)* पंढरपूर तसेच पंढरपूर सायकल्स क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांना नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
या सायकलवारीमध्ये पंढरपूर भुईंज बालाघाट,बुलढाणा, दवडाई, गंगाखेड ,इचलकरंजी, कोल्हापूर, कुर्डवाडी, कोरेगाव कुपवाड,लातूर,मालेगाव ,माढा नाशिक, परभणी,फलटण, पलूस, सोलापूर, संभाजीनगर, सांगली श्रीपुर, उंब्रज,मोरगाव, बारामती व इतर असंख्य शहरांन मधून सायकल प्रेमी हजर राहणार आहेत ते त्यांच्या शहरापासून पंढरपूर पर्यंत सायकलवारी करीत येणार आहेत, या मध्ये साधारण पणे ५० की. मी. ते ५०० की. मी.  अंतरावरून सायकल वारी करीत येणार आहेत या कामी स्थानिक लोकांनी त्यांना सहकार्य करावे व सहभागी व्हावे हि यजमान बारामती सायकल क्लब बारामती यांच्यातर्फे विनंती.