युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी तालुका मंगळवेढा या
कारखान्याच्या प्रांगणात असणाऱ्या श्री पांडुरंग
प्रतिष्ठान पंढरपूर संचलित, कर्मयोगी
विद्यानिकेतन पाटखळ या प्रशालेचा
शैक्षणिक वर्ष 2022-2023 मधील दिनांक
15 जून चा पहिला दिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू झाला. काही रुसलेले
तर, काही फुललेले चेहरे ,तितकेच निरागस आणि नव-नवीन निष्पाप भावनेचे प्रतिबिंब असलेले चेहरे.
गेली दीड - दोन महिने बंद असणारी शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली.विद्यार्थांचा उत्साह व रूसलेला चेहरा पाहताना
पालक व शिक्षक वर्ग ही भावुक झालेले दिसून आले. पालकांनी आपल्या पालकांच्या मुलांच्या उज्ज्वल
भविष्याची दोरी तितक्याच विश्वासाने कर्मयोगी विद्यानिकेतन च्या शिक्षकांच्या हाती
सोपवली आहे.
अल्पावधीतच मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागांमध्ये नावारूपाला आलेल्या कर्मयोगी
विद्यानिकेतन या प्रशालेने मागील पाच ते
सहा वर्षांमध्ये विद्यार्थ्यांशी व पालकांशी एक विश्वासाचे,गुणवत्तेचे व उत्तम असे संस्काराचे नाते निर्माण केले असून आमदार प्रशांत परिचारक
यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या सर्वच संस्था आपली वेगळी ओळख निर्माण
करून कार्यरत आहेत. कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशाले
मध्ये
जूनियर के-जी ते पाचवी पर्यंत चे वर्ग आहेत. उत्तम शिक्षण - योग्य संस्कार, व उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, प्रशस्त व निसर्गरम्य
परिसर, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी
स्वतंत्र कार्यशाळा, अद्यावत अशा नियोजनामुळे शाळेला परिसरातून चांगला
प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती प्र. मुख्याध्यापिका रूपाली काळुंगे यांनी दिली शाळेच्या
पहिल्या दिवशी शाळेच्या शिक्षिका यांनी सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून, गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, पताके, फुले व सर्वत्र असणारे
फुगे यामुळे शाळेचे वातावरण अत्यंत चैतन्यमय असे दिसून येत होते.
फोटो
: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करताना शिक्षिका दिसत आहेत.
No comments:
Post a Comment