Wednesday, November 11, 2020

युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊसतोडणी कामगार यांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्य व सॅनिटायझर चे वाटप



युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊसतोडणी कामगार यांना फडामध्ये जाऊन  दिवाळी साहित्य व  सॅनिटाय चे वाटप

युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट दिली तर कामगारांना १६.६६% इतका बोनस देऊन ऊस उत्पादक व कामगारांची ही दिवाळी गोड केली. याच वेळी सामाजिक जाणीवेतून, संवेदनशीलता जपत शेकडो कि.मी.दूर वरुन आलेल्या ऊस तोडणी कामगारांची ही दिवाळी गोड व्हावी, या हेतूने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून ऊसतोडणी कामगार यांना ऊसाच्या फडात जाऊन दिवाळी साहित्याचे तसेच कोरोना सारख्या रोगापासून सुरक्षितता व्हावी म्हणून सॅनिटाय चे ही वाटप चि.ऋषीकेश उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

         कारखान्याच्या प्रगती मध्ये सर्वात तळातील भूमिका बजाविणारे ऊस तोडणी कामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या घरापासून,आपल्या नातलगांपासून शेकडो कि.मी.दूर येऊन पहाटे पासून कडाक्याच्या थंडीमध्ये ही ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणीचे काम करीत असतात.असे ऊस तोड कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळी सणा पासून वंचित राहू नये या करीता युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी सणा करीता आवश्यक असणारे सुगंधी तेल,साखर,उटणे,रवा,मैदा,खाद्यतेल,मोती साबण,बेसन, अशा प्रकारचे साहित्य व सध्याच्या कोविड-१९ या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या वातावरणा मध्ये खबरदारीचा उपाय म्हणून युटोपियन शुगर्स ने उत्पादित केलेल्या को-गो हँड सॅनिटाय व मास्क चे मोफत वाटप कारखान्याच्या वतीने चि. ऋषीकेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर पं.स.सभापती दिलीप (अप्पा) घाडगे युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांचे सह ऊस तोडणी कामगार उपस्थित होते.

फोटो ओळी: युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी कामगारांना फडामध्ये जाऊन दिवाळी सणा करीता आवश्यक असणारे साहित्यवाटप करताना चि. ऋषीकेश परिचारक, दिलीप (अप्पा) घाडगे, युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व ऊस तोडणी कामगार आदी दिसत आहेत.


 

Tuesday, November 10, 2020

युटोपियन शुगर्स ची ऊस उत्पादकांना २०० रु.ची दिवाळी भेट ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा,कामगारांनाही १६.६६% बोनस- उमेश परिचारक

 

युटोपियन शुगर्स  लि. पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने या पूर्वीच ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे  गळीत हंगाम २०१९-२० या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन २०० रु. प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली असल्याची व कामगारांचीही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांनाही १६.६६% बोनस म्हणून दिला असल्याची माहिती  कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली. 

       यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले कि,युटोपियन शुगर्स ने गळीत हंगाम २०१९-२० मध्ये ,०३,२३२ मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करीत ९.९१% इतक्या सरासरी रिकव्हरी ने ,९९,५००क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे पुरेशा प्रमाणावर ऊस आहे. मात्र कारखाना प्रशासनावर विश्वास टाकून ज्या  ऊस उत्पादकांनी २०१९-२० या गळीत हंगामामध्ये युटोपियन शुगर्स ला ऊस दिला आहे त्या सर्व ऊस उत्पादकांना दिवाळी भेट देणार असल्याचे कारखाना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले होते,त्यास अनुसरून शब्द्पूर्ती करीत ऊस उत्पादकांना प्रति मे.टन २०० प्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.

       दिवाळीच्या तोंडावरती सदर ची रक्कम मिळत असल्याने ऊस उत्पादकांमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या ऊस उत्पादकांना दिवाळीची साखर हि घरपोच देण्यात येणार  असल्याचे सांगून शेती विभागा मार्फत सदर च्या साखरेचे वाटप चालू करण्यात आले आहे.कारखान्याच्या उभारणी मध्ये कामगारांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे कामगारांची जिद्द,चिकाटी,व सकारात्मक दृष्टीकोण या बाबी कारखान्याच्या प्रगती मध्ये हातभार लावणार्‍या असतात. त्यामुळे त्यांची ही दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कामगारांना ही १६.६६% प्रमाणे बोनस देण्यात आला असल्याची माहिती ही चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.तसेच त्यांनी ऊस उत्पादक,कर्मचारी, व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

या प्रसंगी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी वर्ग उपस्थित होता.