युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊसतोडणी कामगार यांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्य व सॅनिटायझर चे वाटप
युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने
दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना २०० रुपये प्रमाणे दिवाळी भेट दिली तर कामगारांना
१६.६६% इतका बोनस देऊन ऊस उत्पादक व कामगारांची ही दिवाळी गोड केली. याच वेळी सामाजिक
जाणीवेतून, संवेदनशीलता जपत
शेकडो कि.मी.दूर वरुन आलेल्या ऊस तोडणी कामगारांची ही दिवाळी गोड व्हावी, या हेतूने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून व
मार्गदर्शनातून ऊसतोडणी कामगार यांना ऊसाच्या फडात जाऊन दिवाळी साहित्याचे तसेच कोरोना
सारख्या रोगापासून सुरक्षितता व्हावी म्हणून सॅनिटायझर चे ही वाटप चि.ऋषीकेश उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते
करण्यात आले.
कारखान्याच्या प्रगती मध्ये
सर्वात तळातील भूमिका बजाविणारे ऊस तोडणी कामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी
आपल्या घरापासून,आपल्या नातलगांपासून शेकडो कि.मी.दूर येऊन
पहाटे पासून कडाक्याच्या थंडीमध्ये ही ऊसाच्या फडामध्ये जाऊन ऊस तोडणीचे काम करीत
असतात.असे ऊस तोड कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळी सणा पासून वंचित राहू नये या
करीता युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी कामगारांना ऊसाच्या फडामध्ये जाऊन
दिवाळी सणा करीता आवश्यक असणारे सुगंधी तेल,साखर,उटणे,रवा,मैदा,खाद्यतेल,मोती साबण,बेसन, अशा प्रकारचे साहित्य व सध्याच्या कोविड-१९ या विषाणूंच्या
प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या वातावरणा मध्ये खबरदारीचा उपाय म्हणून युटोपियन
शुगर्स ने उत्पादित केलेल्या को-गो हँड सॅनिटायझर व मास्क चे मोफत वाटप कारखान्याच्या वतीने चि. ऋषीकेश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पंढरपूर पं.स.सभापती दिलीप (अप्पा) घाडगे
युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी
धनंजय व्यवहारे यांचे सह ऊस तोडणी कामगार उपस्थित होते.
फोटो ओळी: युटोपियन शुगर्स च्या वतीने ऊस तोडणी
कामगारांना फडामध्ये जाऊन दिवाळी सणा करीता आवश्यक असणारे साहित्यवाटप करताना चि. ऋषीकेश परिचारक, दिलीप
(अप्पा) घाडगे, युटोपियन शुगर्स चे मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व
ऊस तोडणी कामगार आदी दिसत आहेत.